स्थानिक पुढारी ‘कडू’ अन्‌ बच्चू कडू ‘गोड’

चांदवड - चांदवड प्रांत कार्यालयात बुधवारी ‘मुक्काम मोर्चा’वेळी शेतकऱ्यांसमोर भाषण करताना आमदार बच्चू कडू.
चांदवड - चांदवड प्रांत कार्यालयात बुधवारी ‘मुक्काम मोर्चा’वेळी शेतकऱ्यांसमोर भाषण करताना आमदार बच्चू कडू.

गणूर - चांदवड प्रांत कार्यालयात आमदार बच्चू कडू यांच्या ‘मुक्काम मोर्चा’ला शेतकऱ्यांचा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद बघता यापूर्वी तालुक्‍यातील सर्वच स्थानिक पुढाऱ्यांच्या आंदोलनांचे रेकॉर्ड ब्रेक झाल्याचे दिसून आले. पाचशे किलोमीटरवरून आलेल्या बच्चू कडू यांच्या ‘मुक्काम मोर्चा’ला पाठिंबा दर्शविण्यासाठी चांदवड तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. 

कांद्याचे भाव मागील दोन महिन्यांपासून मातीमोल झाल्याने नाशिक जिल्हाभरात वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून आंदोलने छेडण्यात आली; परंतु नेहमीच्या धरसोड वृत्तीमुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याऐवजी फोटोसेशन करण्यातच धन्यता मानली. त्यामुळे शेतकऱ्यांचा या चमको पुढाऱ्यांवरील विश्‍वास उडाल्याने मागील आंदोलनांमध्ये पक्षाचे कार्यकर्ते वगळता शेतकरी कुठेही दिसला नाही. मात्र आजच्या आंदोलनाने हा शिक्का पुसला जाऊन बच्चू कडू यांच्या आंदोलनाला तालुक्‍यातून, गावागावांतून शेतकरी सकाळपासूनच तळ ठोकून होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com