'पक्षांतर करणाऱ्यांना जोड्याने मारलं पाहिले'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

'महाजनादेश' जनतेच्या पैशांची उधळपट्टी

अमरावती : सध्या मैदानात एकच पैलवान आहे. कुस्ती होणार की नाही हे माहिती नाही. कारण सत्तेचे लालची लोक आहेत. त्यांना खुर्ची असल्याशिवाय राहत नाही. ज्यांना दहा-दहा वर्षे मंत्रिपद मिळाले, असे लोक जर पुन्हा आमदार होण्यासाठी पक्षांतर करत असतील तर अशा नेत्यांना मतदारांनी जोड्याने मारले पाहिजे, असे वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले.

सध्या भाजप आणि शिवसेनेत सुरु असलेल्या नेत्यांच्या मेगाभरतीवर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू बोलत होते. ते म्हणाले, सत्तेच्या मागे पळणारे लोकप्रतिनिधी निवडून यायला नकोच. नैतिकता असायला हवी. विचारधारा असायला हवी. आम्ही पंधरा वर्षे एका ठिकाणी स्वतःला विचारधारेच्या खांबाला बांधून घेतले आहे. मात्र, सत्तेसाठी पक्षांतर करणारे नालायक लोक या देशात असतील ते हिजड्याची अवलाद आहे.

'महाजनादेश' जनतेच्या पैशांची उधळपट्टी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा म्हणजे फक्त जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे. सत्तेचा वापर हा पक्ष बांधणीसाठी होत असेल तर ते चुकीचे आहे. या जनादेश यात्रेत जनता कुठेच नाही फक्त आदेश दिसून येत आहेत. जनतेच्या प्रश्नावर यात काहीच बोलले जात नाही, असेही बच्चू कडू म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bachchu Kadu Criticizes who Changes Party For Power