मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून दूर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

मुंबई - महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अद्याप 2017-18 च्या शैक्षणिक वर्षाची शिष्यवृत्ती मिळालेली नाही. संकेतस्थळावरील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात अडचणी येत आहेत. सामाजिक न्याय विभाग याला जबाबदार आहे. ही शिष्यवृत्ती 14 एप्रिलपर्यंत न मिळाल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने दिला आहे. 

शिष्यवृत्ती मिळण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा दिली आहे; मात्र ऑनलाइन सुविधेत अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे शिष्यवृत्तीला मुकावे लागत असल्याची तक्रार विद्यार्थी करत आहेत. 2016-17 मध्ये शिष्यवृत्ती फॉर्म भरणाऱ्यांची संख्या पाच लाख 24 हजार 222 होती. ती या गोंधळामुळे 2017-18 मध्ये चार लाख 48 हजार 792 वर आली. सामाजिक विभागाच्या उदासीनतेमुळे अनेक विद्यार्थ्यांनी अर्जच भरला नसल्याचा आरोप एसएफआयकडून करण्यात आला आहे. 

फी विद्यार्थ्यांच्या खात्यावर नको! 
विद्यार्थ्यांची शिकवणी फी पूर्वीप्रमाणे महाविद्यालयाच्या खात्यावर जमा करावी, अशी प्रमुख मागणीही स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने केली. नव्या नियमानुसार, शिकवणी फी विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली जाणार आहे. मात्र, महाविद्यालय व्यवस्थापन विद्यार्थ्यांकडून अवाजवी पैसे उकळून त्यांना मानसिक त्रास देईल, अशी भीती एसएफआयचे सचिव बालाजी कलेटवाड यांनी व्यक्त केली.

Web Title: backward class scholarship issue