ईश्‍वरी चिठ्ठीविरुद्ध बागलकर न्यायालयात जाणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

मुंबई - महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 220 मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अतुल शहा आणि शिवसेनेचे उमेदवार सुरेंद्र बागलकर यांना समान मते पडल्यानंतर ईश्‍वरी चिठ्ठीद्वारे भाजपचे उमेदवार विजेते ठरले. मात्र, या निर्णयावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेचे उमेदवार न्यायालयात धाव घेणार आहेत.

अनेकदा फेरमतमोजणी केल्यानंतरही बागलकर आणि शहा यांना समान मते पडल्यानंतर आयुक्तांनी ईश्‍वरी चिठ्ठीचा पर्याय समोर आणला. त्याद्वारे दोन चिठ्यांवर दोन्ही उमेदवारांची नावे लिहिण्यात आली. या चिठ्ठ्या एका डब्यात टाकण्यात आल्या. उपस्थितांपैकी एका लहान मुलीच्या हातून एक चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये शहा यांचे नाव आले आणि त्यांना विजेते घोषित करण्यात आले. या प्रक्रियेबद्दल बागलकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगासमोर असलेला टेंडर व्होटस्‌चा पर्याय का वापरला गेला नाही, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही ईश्‍वरी चिठ्ठीला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या निर्णयाविरुद्ध बागलकर न्यायालयात धाव घेणार आहेत.

Web Title: Bagalkar goes court against god note