विखे-पाटील यांनी काँग्रेस सोडल्यास...

विखे-पाटील यांनी काँग्रेस सोडल्यास...

मुंबई : काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजपप्रवेशानंतर राधाकृष्ण विखे-पाटीलही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेस सोडल्यास काय परिणाम होतील, याबाबतच्या शक्यता.

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अद्याप विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यांनी 5-6 दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये त्यांनी सुजय यांचा भाजप प्रवेश झाल्याची कल्पना दिली. मी काँग्रेस आणि मुलगा भाजपमध्ये असल्याने याबाबतचे राजकीय चित्र रंगवले जात आहे. सुजयसाठी काँग्रेसने विचार केला नाही. काँग्रेसने आम्हाला जागा सोडली नाही. म्हणून सुजय काँग्रेसमधून बाहेर पडला. 

दरम्यान, राधाकृष्ण विखे-पाटील दबावापोटी राजीनामा देणार नाहीत. मात्र, पक्षांतर्गत नाराजी आहे. राधाकृष्ण यांच्याविरोधात काँग्रेसमधील विविध नेतेमंडळी आहेत. बाळासाहेब थोरात हे त्यांच्या विरोधकांपैकीच एक आहेत. तसेच पृथ्वीराज चव्हाणही आहेत. नारायण राणे यापूर्वी होते. मात्र, आता ते पक्षात नाहीत. विखे-पाटील यांनी राजीनामा दिल्यास नगरमध्ये अनेक घडामोडी घडू शकतात. 

राधाकृष्ण विखे-पाटील हे नगरमधील प्रभावी राजकारणी आहेत. त्यांचा मोठा गट नगरमध्ये आहे. पक्षात आणि पक्षाबाहेरही त्यांची लोकं आहेत. लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही याचे परिणाम होतील. तसेच नगरसोबत राज्यातही याचा मोठा परिणाम होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com