बाळासाहेबांचे स्मारक महापौर बंगल्यातच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 सप्टेंबर 2016

मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दादर येथील महापौर बंगल्यात करण्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंगळवारी (ता. 13) शिक्कामोर्तब केले.

स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी त्याचे भूमिपूजन करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे; मात्र या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्‍यता आहे. स्मारक महापौर बंगल्यात उभे राहिल्यास महापौरांना नवा निवारा शोधावा लागणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवसेनेच्या मागणीनुसार दादर शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेची शिफारस केली होती; तसेच या स्मारकासाठी उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती स्थापन केली होती. या समितीने महापौर बंगल्यात स्मारक करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. आता त्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच त्याचे भूमिपूजन करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळे महापौरांना नवे घर शोधावे लागणार आहे.

महापौर बंगल्यात बाळासाहेबांच्या स्मारकाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, तेव्हा त्याला विरोधी पक्षांनी विरोध केला होता. त्यातच सरकारी निवासस्थानांमध्ये स्मारके उभारू नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानंतरही राज्य सरकारने महापौर बंगल्यात स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याला न्यायालयातही आव्हान दिले जाण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: balasaheb memorial Mayor bangalo