Sanjay Raut : बाळासाहेब ठाकरे एक लाख मोदींना भारी ; संजय राऊत यांचा घणाघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

Sanjay Raut : बाळासाहेब ठाकरे एक लाख मोदींना भारी ; संजय राऊत यांचा घणाघात

Sanjay Raut :  शिवसेनेच्या ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा आज बीडमध्ये सुरु असून या ठिकाणी या यात्रेचा समारोप आहे. यात्रेनंतर झालेल्या सभेत खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. नरेंद्र मोदी यांच्यावर देखील राऊत यांनी हल्लाबोल केला.

महाप्रबोधन यात्रा सुरू झाली तेव्हा मी तुरुंगात होतो. एका वाघीनीने ही यात्रा सुरू केली होती. आनंदाची शिधा काय भिक देता का? ४० आमदारांना पन्नास कोटींची शिधा देता. आमच्या गोरगरीब जनतेला, १ किलो साखर देता, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

संजय राऊत यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा देखील या सभेत मांडला. २ हजारच्या नोटबंदीवरुन त्यांनी मोदींवर टीका केली. २ हजारची नोट कुणाकडे असतील तर ५० खोके वाल्यांकडे आहेत, अदानीकडे आहेत, असे राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना मी आजही माजी मुख्यमंत्री म्हणत नाही. कारण सुप्रीम कोर्टाने सध्याचे सरकार बेकायदेशीर असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा दिला नसता तर ते आज मुख्यमंत्री असते, असे कोर्टाने सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे आजही मुख्यमंत्री आहे.

शिंदे गटाला थोडी लाज वाटत असेल तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, असे राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे एक लाख मोदींना भारी आहेत. मोदींनी कर्नाटकमध्ये ज्या मतदारसंघार रॅली केली तिथे भाजप हारली आहे. महाराष्ट्रात आम्ही बाळासाहेबांचा फोटो लावतो तुम्ही मोदी-शहांचा फोटो लावा, असे देखील राऊत म्हणाले.