जोर्वेचे कार्यकर्ते ते कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते; थोरातांचा थक्क करणारा प्रवास

जोर्वेचे कार्यकर्ते ते कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते; थोरातांचा थक्क करणारा प्रवास

नगर : कॉंग्रेसच्या विधिमंडळ नेते पदावर माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे. या निवडीचे जिल्ह्यात स्वागत होत आहे. जोर्वे गावचा एक कार्यकर्ता ते कॉंग्रेसचा विधिमंडळातील नेता असा आमदार थोरात यांचा प्रवास थक्क करणारा ठरला आहे. हुशार, मृदुभाषी, चारित्र्यवान व कार्यक्षम नेता, असा प्रश्न जिल्ह्याच्या राजकीय पटलावर पडल्यास मोजक्‍या नेत्यांची नावे पुढे येतील, त्यात संगमनेर विधानसभेचे आमदार तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव अग्रभागी येते. 

नगर : कॉंग्रेसच्या विधिमंडळ नेते पदावर माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे. या निवडीचे जिल्ह्यात स्वागत होत आहे. जोर्वे गावचा एक कार्यकर्ता ते कॉंग्रेसचा विधिमंडळातील नेता असा आमदार थोरात यांचा प्रवास थक्क करणारा ठरला आहे. हुशार, मृदुभाषी, चारित्र्यवान व कार्यक्षम नेता, असा प्रश्न जिल्ह्याच्या राजकीय पटलावर पडल्यास मोजक्‍या नेत्यांची नावे पुढे येतील, त्यात संगमनेर विधानसभेचे आमदार तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव अग्रभागी येते. 

आपल्या मतदारसंघाची धुरा सांभाळताना कॉंग्रेसच्या देशपातळीवरील समितीमध्ये स्थान पटकावून थोरात यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे. 
1985 मध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून बाळासाहेब थोरात निवडून आले. त्यानंतर आतापर्यंत त्यांच्यापासून विधानसभेचे सदस्यत्त्व दूर गेले नाही. मतदारसंघातील प्रत्येक गावातील मतदार, कार्यकर्ते, स्थानिक समस्या त्यांना खडानखडा माहिती आहे. विरोधकांनी केलेल्या हल्ल्याला उत्तर देताना अत्यंत समन्वयाने व संयमाने तोंड देणे, हे त्यांचे वैशिष्ट्य. कोणी कितीही टीका केली, तरी आपला तोल ढळू न देण्यात ते तरबेज आहेत. प्रचारात बहुतेक वेळा प्रतिस्पर्ध्यांचा नामोल्लेख टाळतात. 

विधानसभेच्या निवडणुकीचे आव्हान ः आमदार थोरात 
विधिमंडळाच्या नेतेपदावर निवड झाल्यानंतर" सरकारनामा" शी बोलताना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, आगामी काळात विधानसभा निवडणुका आहेत. विधिमंडळाचे कॉंग्रेसचे नेतेपद मिळाल्यामुळे जबाबदारी वाढली आहे. या पदाच्या माध्यमातून कॉंग्रेसची ताकद वाढविण्याचे काम करणार आहे. 

राजकीय वारसा 
थोरात यांचे वडील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा त्यांना वारसा आहे. अधिपत्याखालील संगमनेर सहकारी साखर कारखाना उत्तम प्रकारे चालवून त्यांनी आदर्श घडवून दिला. महाविद्यालयीन जीवनात पुण्यातील फग्युर्सन महाविद्यालयात असतानाच परीक्षाशुल्क व इतर शैक्षणिक प्रश्नांवर त्यांनी आंदोलने केली. त्यानंतर कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली. पुढे आपल्या स्वतःच्या जोर्वे गावात अमृतवाहिनी सहकारी दूध संस्था स्थापन करून त्यांनी सहकार क्षेत्रात पदार्पण केले. 1980 मध्ये विडी कामगार व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आंदोलनात भाग घेतला. त्या काळात त्यांना कारावासही भोगावा लागला. संगमनेरला 132 केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र व्हावे, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न विशेष गाजले. 1992 मध्ये शेती व दूध व्यावसायाच्या अभ्यासक्रमासाठी स्वित्झर्लंड व डेन्मार्कचा दौरा केला. 1999 मध्ये थोरात यांना राज्याच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे राज्यमंत्री म्हणून स्थान मिळाले. नंतर त्यांना कृषीमंत्री, महसूलमंत्री म्हणून कारकीर्द गाजविता आला. 

राहुल गांधी यांचे विश्वासू 
कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणून आमदार थोरात यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणुकीतील कॉग्रेसच्या विधिमंडळ निरीक्षकपदी थोरात यांची निवड झाली होती. गुजरात निवडणुकीच्या दरम्यान विधानसभा सदस्य निवडीच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी उत्कृष्ठ काम केले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही थोरात यांनी कसून प्रयत्न केले. सध्या कॉंग्रेसमध्ये वरिष्ठ नेता म्हणून थोरात यांच्याकडे पाहिले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com