MVA Rally : अदानींच्या कंपनीतील २० हजार कोटी कोणाचे? थोरातांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल | Balasaheb Thorat attacked on Narendra Modi Government | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Thorat

MVA Rally : अदानींच्या कंपनीतील २० हजार कोटी कोणाचे? थोरातांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर - माहाविकास आघाडीच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमुठ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. तिन्ही पक्षांनी मिळून ही सभा आयोजित केल्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या वेळी काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

थोरात म्हणाले की, आम्ही कोऱोनाच्या अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यात नेतृत्वात राज्याचा विकास कमी होऊ दिला नाही. मात्र आताचं सरकार काय करत हे सांगायची गरज नाही. मात्र केंद्र सरकार विरोधात बोलणाऱ्यांमागे ईडी लावतं. सीबीआयची भीती दाखवतं.

दरम्यान राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देशात फिरले. राहुल गांधींनी सभागृहात प्रश्न विचारला. त्यावर त्यांना बोलू दिलं नाही. राहुलजी परदेशात गेले असताना त्यांच्यावर आरोप कऱण्यात आले. राहुलजींची सदस्यता काढून घेण्यात आले. त्यामुळे लोकशाहीची अवस्था काय आहे, न बोललेच बर, असंही थोरात म्हणाले.

राहुलजी यांनी एकच प्रश्न विचारला, की अदानींच्या खात्यात २० हजार कोटी रुपये कुठून आले, मात्र त्यावर उत्तर द्यायला सरकार तयार नाही. मात्र जनतेला सगळ कळायला लागलं आहे, असंही थोरात म्हणाले.