बाळासाहेब थोरात : १९८५ला पहिल्यांदा अपक्ष आमदार ते ठाकरे सरकारमधील मंत्री

टीम-ई-सकाळ
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

 • संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात जन्म
 • संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार 
 • बाळासाहेब थोरातांचा थक्क करणारा प्रवास

पुणे : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (ता.२८) मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शपथ घेतली. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

बाळासाहेब थोरातांचा जीवन प्रवास पाहायचे झाल्यास ०७ फेब्रुवारी १९५३ रोजी त्यांचा जन्म संगमनेर तालुक्यातील जोर्वे या गावात झाला. संगमनेर महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बी. ए. चे शिक्षण पुर्ण केले. तर, आयएलएस लॉ महाविद्यालयातून कायद्याची शिक्षण पूर्ण करत पदवी प्रदान केली. कायद्याचे शिक्षण घेत असतानाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सभा घेऊन पाणी प्रश्नावरील चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता.

मी आज शपथ घेणार नाही : अजित पवार

१९७८ साली त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी शेती आणि वकिली व्यवसाय करण्यास सुरुवात केली. गावातच अमृतवाहिनी सहकारी दुध उत्पादक संस्थेची स्थापना केली. विडी कामगार व शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. यावेळी विसापूर जेलमध्ये त्यांना ९ दिवसांचा कारावस भोगावा लागला होता. त्यांनंतर त्यांनी मराठवाडा नामांतर चळवळ, संगमनेरला १३२ के.व्ही सबस्टेशन व्हावे यासाठी केलेली चळवळ अशा अनेक चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघावर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर गावातील अमृतवाहिनी सहकारी दुध उत्पादक संस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली.  

बाळासाहेब थोरातांचा थक्क करणारा प्रवास

 • १९८५ - संगमनेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी
 • १९८८ - संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघावर चेअरमन म्हणून बिनविरोध निवड
 • १९८९ - संगमनेर तालुका सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड
 • १९९० - संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आयच्या तिकीटावर विजयी
 • १९९२ - संगमनेर तालुका सहकारी सुत गिरणीची स्थापना
 • १९९३ संगमनेर तालुका सहकारी पतसंस्थेच्या फेडरेशनच्या चेअरमनपदावर बिनविरोध निवड
 • १९९५ - संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आयच्या तिकीटावर तिसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी
 • १९९७ - नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को- ऑप.लि. नवी दिल्ली या संस्थेच्या संचालकपदी निवड
 • १९९९ - महाराष्ट्र काँग्रेस आयच्या सरचिटणीसपदी निवड
 • १९९९ - संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवड
 • १९९९ - महाराष्ट्र राज्याच्या पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री म्हणून समावेश
 • २००० - उस्मानाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती
 • २००३ - महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री म्हणून फेरनिवड
 • २००४ - संगमनेर मतदारसंघातून सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवड
 • २००४ - महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कृषी, जलसंधारण व खार जमीन कॅबिनेट मंत्री म्हणून निवड
 • २००६ - नगर जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदी नियुक्ती, महाराष्ट्र राज्य जलसंधारण सल्लागार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवड
 • २००९ - संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा निवड
 • २०१० - पृथ्वीराज चव्हाणांच्या मंत्रीमंडळात महसूल खात्याची जबाबदारी
 • २०११ - औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री
 • २०१४- संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग सातव्यांदा निवड
 • २०१७- हिमाचल प्रदेश काँग्रेस पक्षाचे निरिक्षक म्हणून निवड
 • २०१८ - काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीत कायम स्वरुपी सदस्य म्हणून निवड
 • २०१९ - काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती, विधानसभेत काँग्रेसच्या गटनेतेपदी नियुक्ती, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी.

  Image may contain: 2 people, people smiling, indoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balasaheb Thorat journey in maharshtra politics