काँग्रेसकडून अशोक चव्हाणांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' नेत्याची निवड?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी आमदार बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे.

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी आमदार बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे.

लोकसभेतील पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. मात्र तो स्वीकारण्यात आलेला नाही. मात्र ताज्या घडामोडींनुसार हा राजीनामा तातडीने स्वीकारण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून  बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षभरात बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेस पक्षातील महत्व वाढले आहे. त्यांना पक्षाने 'एआयआयसीसी'वर संधी दिली. काही दिवसांपुर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेब थोरात यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात त्यांना काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बनवण्यात आले. विजय वडेट्टीवारांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. आता नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांचे नाव ताकदीने पुढे आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Thorat is new congress Prsident in Maharashtra