Vidhan Sabha 2019 : जेष्ठ नेत्यांच्या लढण्यावर थोरातांकडून स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

काँग्रेसच्या विद्यमान आमदार अमिता चव्हाण यांच्याऐवजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी काँग्रेसची इच्छा असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

मुंबई : काँग्रेसच्या विद्यमान आमदार अमिता चव्हाण यांच्याऐवजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी काँग्रेसची इच्छा असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांच्या विधानसभा निवडणूक लढण्यावर थोरात यांनी स्पष्टीकरण दिले असून, पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी आज (ता.05) स्पष्ट केले. तसेच माजी खासदार राजीव सातव हे निवडणूक लढवणार नसल्याचेही थोरात यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीबाबत चर्चा झाली असून 70 टक्के जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचे एकमत झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Thorat speak about congress leaders fight in vidhansabha