
Balasaheb Thorat: नाराजीच्या चर्चेवर बाळासाहेब थोरात पहिल्यांदाच बोलले, मला तर...
माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात विधान परिषदेच्या निवडणुकांनंतर नाराज असल्याच्या चर्चांना उधान आलं होतं.
मात्र आज त्यांनीच या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की 'कोणी सांगितलं मी नाराज होतो' असा त्यांनीच पत्रकारांना उलटप्रश्न केला.
तसेच 'पत्र व्यवहार प्रत्येक संघटनेत होतो, तसाच आम्ही देखील केला' अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात नाराज नसल्याचे समोर आले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना तिकीट देण्यात यावं अशी इच्छा थोरातांची होती.
मात्र सत्यजित तांबे यांना तिकीट न दिल्याने तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे सत्यजित तांबे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. याच काळात बाळासाहेब थोरात नाराज असल्याच्या चर्चांना उधान आलं होतं.