Shiv Sena : शिंदे गटातील 50 आमदारांची संख्या अजून वाढेल, पण कमी होणार नाही; शंभूराज देसाईंचं मोठं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai Maharashtra Politics

भाजपा-शिंदे गट या सत्ताधारी पक्षातल्या दोन नेत्यांमध्ये आर-पारची लढाई सुरु झालीय.

Shiv Sena : शिंदे गटातील 50 आमदारांची संख्या अजून वाढेल, पण कमी होणार नाही; शंभूराज देसाईंचं मोठं विधान

Maharashtra Politics : राज्यातील भाजपा-शिंदे गट या सत्ताधारी पक्षातल्या अमरावती जिल्ह्यातल्या दोन नेत्यांमध्ये आर-पारची लढाई सुरु झालीय. सुरुवातीला शीतयुद्ध दिसणाऱ्या या प्रकारानं आता गंभीर वळण घेतलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत.

दोघांनीही एकमेकांवर आरोप करताना पातळी सोडल्याचं दिसून येत आहे. हे दोन नेते म्हणजे, बडनेऱ्याचे आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu). आमदार रवी राणा यांनी माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.

हेही वाचा: Twitter चे मालक होताच Elon Musk ची मोठी कारवाई; CEO पराग अग्रवाल यांची हकालपट्टी

बच्चू कडूंनी काल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इशारा दिला आहे. बिनबुडाचे आरोप करुन प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न कोणी करु नये. माझ्या संपर्कात सध्या सरकारमध्ये नाराज असलेले 7 ते 8 आमदार असल्याचा दावाही यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे. तसंच एक नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर केले नाही आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेतली नसल्यास आपण धमाका करणार असल्याचा इशाराही बच्चू कडूंनी दिलाय.

हेही वाचा: Meta : नोकरी वाचवायची असेल तर 200 टक्के मेहनत करा, अन्यथा कायमचं घरी जा; झुकेरबर्गचा थेट इशारा

बच्चू कडूंच्या या विधानावर आता मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी भाष्य केलंय. 'बाळासाहेबांची शिवसेना' या आमच्या गटातील आमचे 50 आमदारांची संख्या अजून वाढेल. पण, ही संख्या कमी होणार नाही. आम्ही सर्व एकनाथ शिंदेसोबत आहोत. जे काही अंतर्गत मतभेद असतील ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे मिळून सोडवतील, असं देसाईंनी स्पष्ट केलंय.