प्रचार संपताच जाहिरातींवर बंदी 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

मुंबई - महापालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर राजकीय पक्ष व उमेदवारांना मुद्रित आणि इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांत प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत. त्याचबरोबर 14 फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते 21 फेब्रुवारीच्या मतदान संपेपर्यंत जनमत (ओपिनियन पोल) व मतदानोत्तर (एक्‍झिट पोल) चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यावर बंदी राहील, असे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज सांगितले. 

सहारिया म्हणाले, की पहिल्या टप्पात 16 फेब्रुवारी रोजी मतदान होत असलेल्या 15 जिल्हा परिषदा व 165 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा जाहीर प्रचार 14 फेब्रुवारीला रात्री 12 वाजता संपेल. दुसऱ्या टप्प्यात 21 फेब्रुवारी ला मतदान होत असलेल्या 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा जाहीर प्रचार 19 फेब्रुवारीला रात्री 12 वाजता संपेल; परंतु ध्वनिक्षेपकाबाबतच्या विहित आदेशांचेही पालन करणे आवश्‍यक राहील. महापालिकांच्या निवडणुकांचा प्रचार मतदान समाप्तीच्या 48 तासअगोदर बंद होतो. त्यामुळे 21 फेब्रुवारीला मतदान होणाऱ्या 10 महापालिकांचा जाहीर प्रचार 19 फेब्रुवारीला सायंकाळी संपेल. जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आयोगाच्या 14 ऑक्‍टोबर 2016 च्या आदेशानुसार राजकीय पक्ष किंवा उमेदवारांना मुद्रित अथवा इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रचाराच्या जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत. सहारिया म्हणाले, की 14 फेब्रुवारीच्या रात्री बारापासून ते 21 फेब्रुवारीच्या मतदान समाप्तीपर्यंत कुठल्याही माध्यमांद्वारे जनमत (ओपिनियन पोल) व मतदानोत्तर (एक्‍झिट पोल) चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यावर बंदी राहील.

Web Title: The ban on advertising