गटारे साफ करणाऱ्या रोबोचा सन्मान

गटारे साफ करणाऱ्या रोबोचा सन्मान

पुणे - गटारात उतरून मैला काढण्याचे काम स्वच्छता कर्मचाऱ्यांना करावे लागते. आता हे काम करण्यासाठी जेनरोबोटिक्‍स कंपनीने ‘बॅंडीकॉट’ नावाच्या यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. या यंत्रमानवाला या वर्षीचा ‘अंजनी माशेलकर सर्वसमावेशक नवतंत्रज्ञान’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. 

महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अनोखे अभिवादन करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी पुरस्काराची घोषणा केली. देशातील सुमारे सहाशे जिल्ह्यांमध्ये ५३ हजार स्वच्छता कर्मचारी बंदिस्त गटारांची स्वच्छता करतात. देशभरात सुमारे तीनशे मृत्यू बंदिस्त गटार साफ करताना झाले असल्याचे विविध माध्यमांतून पुढे आले आहे. या नवसंशोधनाने स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अमानवी श्रम वाचविण्यास मदत होणार आहे, असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले. 

पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने आयोजित सातव्या सामाजिक नवकल्पना राष्ट्रीय परिषदेच्या उद्‌घाटन सोहळ्यात उद्योगपती रतन टाटा यांच्या हस्ते १७ नोव्हेंबरला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. समाजातील विविध समस्यांवर तांत्रिक पद्धतीने उपाय शोधणाऱ्या संस्थेस अथवा व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो. 

बॅंडीकॉटची वैशिष्ट्ये
    ५० किलो वजनाचा हा रोबो ३६० डिग्रीमध्ये फिरतो
    कामावर संगणकाद्वारे नियंत्रण 
    दिवसाला दहा बंदिस्त गटारे स्वच्छ करणे शक्‍य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com