बॅंक कर्मचाऱ्याला 42 हजारांना लुटले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

श्रीरामपूर - दुचाकी बंद पडल्याने थांबलेल्या बॅंक कर्मचाऱ्याची बॅग हिसकावून 42 हजार रुपयांची रोकड पळविण्यात आली. नेवासे रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ रविवारी (ता.13) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. चलनातून बंद झालेल्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा या बॅगेत होत्या. 

वाल्मीक राघोबा बोर्डे (वय 52, रा. गोंधवणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी तीन दुचाकीस्वारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या माळवाडगाव शाखेत ते काम करतात. 

बोर्डे यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की घरातील पाचशे व एक हजाराच्या नोटा (एकूण 42 हजार रुपये) बॅंकेत जमा करण्यासाठी सोबत नेले होते. तथापि, बॅंकेत गर्दी असल्याने नोटा जमा करता आल्या नाहीत. कामकाज आटोपल्यानंतर रात्री पैसे घेऊन आपण घरी परतत होतो. उड्डाण पुलाजवळ रात्री दहाच्या सुमारास दुचाकी बंद पडली. ती सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी बॅग हिसकावून पळविली. त्यात पैसे, मोबाईल, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड होते.

Web Title: Bank employee robbed of 42 thousand