संपामुळे सार्वजनिक बॅंकांचे कामकाज ठप्प

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 22 डिसेंबर 2018

मुंबई - वेतनवाढीची मागणी आणि विलीनीकरणाला विरोध करत शुक्रवारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे सार्वजनिक बॅंकांचे कामकाज ठप्प झाले. सुमारे तीन लाख अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्याचा दावा संघटनांनी केला आहे. या संपामुळे एसबीआय, बॅंक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, देना बॅंक यांसारख्या बॅंकांमध्ये शुकशुकाट दिसून आला. आजच्या संपामुळे मनस्ताप सहन कराव्या लागलेल्या ग्राहकांना बॅंकिंग व्यवहारांसाठी आता सोमवारची (ता. २४) प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सार्वजनिक बॅंकांमध्ये नोव्हेंबर २०१७ पासून वेतन करार प्रलंबित आहे. त्यातच सरकारकडून बॅंकांच्या विलीनीकरणाचा धडाका लावला आहे. ‘एसबीआय’च्या विलीनीकरणानंतर केंद्राकडून विजया, देना आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांचे विलीनीकरण प्रस्तावित आहे. याला कर्मचारी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. आजच्या संपात ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स कन्फेडरेशन, ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बॅंक वर्कर्स या संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

सार्वजनिक बॅंकांमधील नऊ संघटनांची प्रतिनिधी संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सकडून २६ डिसेंबरला संपाची हाक देण्यात आली आहे. मंगळवारी (ता. २५) नाताळनिमित्त सार्वजनिक सुटी असून, बुधवारी (ता. २६) संपामुळे पुढील आठवड्यात सलग दोन दिवस ग्राहकांना बॅंकिंग व्यवहार करता येणार नाहीत.

Web Title: Bank Strike Work Stop