बॅंक कर्मचाऱ्यांचा संप तात्पुरता स्थगित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

बॅंक कर्मचारी संघटनेचे नेते आणि अर्थसचिव राजीव कुमार यांच्यात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे बॅंक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी २६ आणि २७ सप्टेंबरला पुकारलेला संप मागे घेतला.

मुंबई -  बॅंक कर्मचारी संघटनेचे नेते आणि अर्थसचिव राजीव कुमार यांच्यात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे बॅंक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी २६ आणि २७ सप्टेंबरला पुकारलेला संप मागे घेतला.

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या बळकटीकरणासाठी केंद्राने त्यांच्या विलीनीकरणाचा निर्णय केला असून, त्याविरोधात संप होणार होता.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank workers strike temporarily suspended