सलग तीन दिवस बॅंकांना सुटी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 मार्च 2017

मुंबई: सोमवारी (ता.13) धूलिवंदनाची सार्वजनिक सुटी असल्यामुळे शनिवारपासून तीन दिवस बॅंका बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना शुक्रवारीच बॅंकांची कामे उरकावी लागणार आहेत.

मुंबई: सोमवारी (ता.13) धूलिवंदनाची सार्वजनिक सुटी असल्यामुळे शनिवारपासून तीन दिवस बॅंका बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना शुक्रवारीच बॅंकांची कामे उरकावी लागणार आहेत.

रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशांनुसार दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सर्व बॅंका कामकाज बंद ठेवतात. या महिन्यातील दुसरा शनिवार (ता. 11) असल्याने बॅंकांना सुटी राहील. सोमवारी धूलिवंदनाची सार्वजनिक सुटी आल्याने बॅंक कर्मचाऱ्यांना शनिवार, रविवार आणि सोमवारी सलग तीन दिवसांची सुटी आहे. यामुळे थेट मंगळवारी (ता.14) बॅंका उघडतील. पुढील चार दिवस "एटीएम'मध्ये पुरेशा प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध करण्याचे आव्हान बॅंकांसमोर आहे. पर्यटनस्थळांवर ग्राहकांनी डिजिटल पेमेंटचा वापर करावा, असे आवाहन बॅंकांनी केले आहे.

Web Title: Banks holidays for three days