"पीककर्ज वाटपात बॅंकांनी संवेदनशीलता दाखवावी' 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 जून 2018

मुंबई - शेतकऱ्यांना पीककर्ज देणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, याचे भान ठेवून बॅंकांनी काम करावे. कर्जवाटप करताना संवेदनशीलता दाखवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. 

मुंबई - शेतकऱ्यांना पीककर्ज देणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, याचे भान ठेवून बॅंकांनी काम करावे. कर्जवाटप करताना संवेदनशीलता दाखवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. 

मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या विविध बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यात खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू झाल्या असून, शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते घेण्यासाठी वित्तीय साहाय्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप वेळेत झाले पाहिजे. मात्र, बऱ्याच ठिकाणी स्थानिक बॅंक शाखांकडून या संदर्भात असंवेदनशीलता दाखविली जात असल्याने शेतकऱ्यांचा बॅंकांवर रोष दिसून येत असून, तातडीने सर्व बॅंकांच्या स्थानिक शाखांपर्यंत पीककर्ज वितरणाबाबत संदेश देण्यात यावेत. 

हायब्रीड ऍन्युईटीच्या रस्त्यांच्या कामाचा आढावा 
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हायब्रीड ऍन्युईटीच्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. या रस्त्यांच्या कामासाठी बॅंकांनी पतपुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागात 177 कामांच्या माध्यमातून 10 हजार किलोमीटर लांबीचे हायब्रीड ऍन्युईटी रस्ते तयार करण्यात येणार आहेत. 15 जुलैपासून रस्त्यांच्या कामांना सुरवात केली जाणार आहे. 

Web Title: Banks should show sensitivity on crop loans