
HSC Result 2023: बारामतीची पॉवर ९५ टक्केपार, अख्ख्या तालुक्याचा १२वीचा निकाल पहा एका क्लिकवर
बारामती - इयत्ता बारावीचा निकाल यंदा उत्तम लागल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यंदा बारामती तालुक्याचा निकाल 95.26 टक्के जाहीर झाला आहे.
बारामती तालुक्यात 7034 विद्यार्थी या परिक्षेसाठी बसले होते. या पैकी 6692 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनी बाजी मारली असून 98.10 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. बारामती तालुकयात 3437 मुले या परिक्षेसाठी बसलेली होती त्या पैकी 3166 उत्तीर्ण झाली असून ही टक्केवारी 92.11 इतकी आहे. तर 3594 मुलींपैकी 3526 मुली उत्तीर्ण झाल्या. ही टककेवारी 98.10 इतकी आहे.
आज निकाल जाहीर होणार असल्याने सकाळपासूनच विद्यार्थी व पालकात उत्सुकता होती. अनेकांनी आपापल्या स्मार्ट फोनवरुनच निकाल पाहण्याचा प्रयत्न केला. स्वताः चा निकाल समजल्यानंतर मित्र मैत्रीणींना किती गुण मिळाले याची चौकशी करताना मुले दिसत होती.
महाविद्यालयनिहाय निकालाची टक्केवारी पुढील प्रमाणे -
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती 92, एम. एस. काकडे ज्युनिअर कॉलेज, सोमेश्वरनगर- 87.16, आर.एन. अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट कनिष्ठ महाविद्यालय- 99.17, श्री शहाजी ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, सुपे 100, श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती- 89.89, न्यू ज्युनियर कॉलेज, वडगाव निंबाळकर- 56.66.
म.ए.सो. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, बारामती- 90, शारदाबाई पवार विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिवनगर- 100, श्री मयुरेश्वर विद्यालय व उच्च महाविद्यालय 98.46, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, वाणेवाडी 100, नव महाराष्ट्र विद्यालय ज्युनियर कॉलेज, पणदरे- 91.06, शारदाबाई पवार महाविद्यालय, शारदानगर- 99.63, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सांगवी- 89.28.
आनंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, होळ- 86.20, विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय- बारामती 94.40, सोमेश्वर विद्यालय, सोमेश्वरनगर- 95.83, उत्कर्ष जुनियर कॉलेज, वाघळवाडी- 74.57, श्रीमंत शंभूसिंह महाराज ज्युनिअर कॉलेज, माळेगाव- 58.82, कृषी उद्योग शिक्षण संस्था, का-हाटी- 98.59, एस.व्ही.एम. अँड ज्युनिअर कॉलेज,भिकोबा नगर-100, सद्गुरु शिक्षण मंडळ, लोणी भापकर- 100.
शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर- 100, श्री सिद्धेश्वर जुनियर कॉलेज कोऱ्हाळे बुद्रुक 97.59, श्री सिद्धेश्वर हायस्कूल, को-हाळे बुद्रुक -100, कै. जिजाबाई गावडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पारवडी- 98.46, म. ए. सो. उच्च माध्यमिक विद्यालय- 86.53, चैतन्य इंटरनॅशनल स्कूल- 100, धों.आ. सातव कारभारी विद्यालय, बारामती- 100, शारदा निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय- 100.
एस.पी.सी.टी.एस. ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स- 100, क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज- 100, अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल संग्राम नगर- 100, अनंत आशा इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पळशी- 100, आदित्य इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वंजारवाडी- 100, शारदाबाई पवार आयटीआय, शारदानगर- 87.50, मयुरेश्वर प्रा. आयटीआय खंडुखैरेवाडी, सुपे- 100, शासकीय आयटीआय- 94.44,
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय (व्होकेशनल) 89.18, मुकुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर- 86.11, आर.एन. अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज (व्होकेशनल)- 83.01, श्री शहाजी उच्च माध्यमिक विद्यालय, सुपे (व्होकेशनल) 97.87, शारदाबाई पवार विद्यालय व जुनिअर कॉलेज, शिवनगर (व्होकेशनल) 100, न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज, वाणेवाडी (व्होकेशनल) 100, नवमहाराष्ट्र विद्यालय व जुनिअर कॉलेज, (व्होकेशनल) पणदरे 100.