बत्तीस शिराळ्याची नागपंचमी संरक्षित करू

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 2 एप्रिल 2017

मुंबई - बत्तीस शिराळ्याचा हा नागपंचमीचा सण "कम्युनिटी रिझर्व्ह' करून तो संरक्षित करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

मुंबई - बत्तीस शिराळ्याचा हा नागपंचमीचा सण "कम्युनिटी रिझर्व्ह' करून तो संरक्षित करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी याबाबत सरकारचे लक्ष वेधले होते. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नागपंचमीचा हा सण अनादीकालापासून सुरू आहे. या वेळी नागाला जिवंत पकडून त्याला कोणतीही इजा न करता परत सोडले जाते. यामुळे नागाला मारण्याचा अथवा इजा करण्याचा हेतू नसतो. त्यासाठी वनकायद्याचा हवाला देत नागपंचमीवर बंदी आलेली आहे. हा सण संरक्षित व्हावा, यासाठी वनमंत्र्याच्या सोबत बैठक घेऊन कायद्यात आवश्‍यक त्या सुधारणा करण्याची सरकारची तयारी आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयातदेखील याबाबतची भूमिका मांडण्यावर सरकार विचार करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: battis shirala nagpanchami secure