विधानसभेच्या कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

विधानसभेच्या कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराची चिंता सोडा, आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना आणि जिल्हा प्रमुखांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

१६ जून रोजी उद्धव ठाकरे अयोध्येला जात असून, या दौऱ्याच्या आधी घेतलेल्या आजच्या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना प्रशासनाविरोधात आक्रमक होण्यास ही बजावले आहे. मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होईल, यापेक्षा आपल्याला आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा कशा जिंकता येतील यासाठी कामाला लागावे लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत सांगितल्याचे समजते.

सेना भवन येथे शुक्रवारी संपर्कप्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक पार पडली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही चर्चा झाली.

दरम्यान, या बैठकीला सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत तसेच शिवसेनेचे महत्वाचे नेते उपस्थित होते.

यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा एकत्र लढणार का असे विचारले असता कुणी काहीही बोलो, शरद पवार काय बोलतात याकडे लक्ष देऊ नका. आपलं ठरलंय.विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपा एकत्रच लढणार असून, कोणतेही मतभेद न ठेवता कामाला लागा असे देखील उद्धव ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांना सांगितले.ज्यांना जे बोलायचे ते बोलू द्या पण तुम्ही आपले काम करा,विजय आपलाच असेल असे देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना पीक विमा लाभ मिळाला नाही, त्यांना तो पुढील पाच दिवसात कसा मिळवून देता येईल यासाठी प्रशासनाविरोधात आक्रमक होण्याचे आदेशही दिले. तसेच पाच दिवसात सर्व जिल्ह्यातील तालुक्यामध्ये शेतकरी आधार केंद्र निघाली पाहिजेत आणि शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही, त्यांना मिळण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेशही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com