पंतप्रधानांच्या हट्टापायी बुलेट ट्रेन : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

चार वर्षांत राम मंदिर आठवले नाही आणि आता निवडणुकांच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा पुढे करण्यात येत आहे.

पुणे : आपल्याकडे पैसे आहेत. महाराष्ट्रासारखे श्रीमंत राज्य देशात नाही. रेल्वेचे अपघात होत आहेत आणि आपण बुलेट ट्रेनचा आग्रह धरत आहोत. एका पंतप्रधानाच्या हट्टापायी बुलेट ट्रेन सुरु करण्याचा घाट घातला आहे. बुलेट ट्रेन हा मुंबईला तोडण्याचा प्रयत्न आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (बुधवार) मोदी सरकारवर निशाणा साधला.

- राज ठाकरे यांच्या वार्तालापातील प्रमुख मुद्दे :-

- चार वर्षांत राम मंदिर आठवले नाही आणि आता निवडणुकांच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा पुढे करण्यात येत आहे.

- शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचा भाग मिळाला पाहिजे. 

- गुजरातमधील अमूल आपल्याकडून दूध घेऊन जात आहे.

- या सर्व गोष्टींना आपण सर्वांनी प्रोत्साहन दिले पाहिजे.

- आपल्याकडे पैसे आहेत. महाराष्ट्रासारखे श्रीमंत राज्य देशात नाही.

- राज्य मोठे कसे होईल, हे आपण सर्वांनी पाहिले पाहिजे.

- बाकीचे राज्ये महाराष्ट्राचा विकास पाहत आहेत.

- वल्लभभाई यांच्या पुतळ्याचे काय झाले ?, असा सवाल यावेळी राज यांनी केला.

- मी स्वत: बोललो नाणार होणार नाही. त्यानंतर आता सगळे बोलत आहेत. 

- राज्याची सत्ता मजाक आहे का? ते भांडणार तुम्ही बातम्या करणार.

- रेल्वेचे अपघात होत आहेत आणि आपण बुलेट ट्रेनचा आग्रह धरत आहोत.

- बुलेट ट्रेन हा मुंबईपासून तोडण्याचा प्रयत्न आहे.

 - मुंबईतील खड्ड्यांविरोधात आमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले तर बाहेरील पोलिस अधिकारी त्यांना मारहाण करतो.

Web Title: Because of Prime Minister bullet train is coming says Raj Thackeray