कसल्या भंगार घोषणा देताय?; पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना झापलं

पंकजा मुंडे
पंकजा मुंडेपंकजा मुंडे

परळी वैजनाथ : मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना भाजपने संधी दिली. बहिणीला संधी न मिळाल्यामुळे पंकजा नाराज असल्याचं बोललं जात होतं. दिल्लीवारीनंतर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली होती. अद्यापही प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद म मिळाल्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र आहे. याचाच प्रत्यय भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये आला.

भाजपच्या वतीने बीडमध्ये जन आर्शिवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. गोपीनाथ गडावरून याचा शुभारंभ झाला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून गोपीनाथ गडावर 'पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है' अशी घोषणा देण्यात आल्या. या घोषणा ऐकून पंकजा मुंडे चांगल्याच संतापल्या. पंकजा मुंडे यांनी त्याच ठिकाणी कार्यकर्त्यांना झापलं. कसल्या फालतू घोषणा देत आहात? आपली संस्कृती अशी नाही, असे पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना म्हणाल्या.

पंकजा मुंडे
तालिबान्यांकडून 'युद्धविराम', आता प्रतीक्षा सत्तांतराची

गोपीनाथ गडावर जन आर्शिवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गडावर चांगलीच घोषणाबाजी केली. उत्साही कार्यकर्त्यांनी 'पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है', अशा घोषणा दिल्या. ही घोषणाबाजी ऐकताच पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना झापले. तुम्ही इथे अशा घोषणा देवू नका, हा दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम नाही. आपल्याच पक्षाचा कार्यक्रम आहे, अशा घोषणांनी बदनामी होते, चुकीच्या घोषणा देणाऱ्यांना मी बोलणार नाही, भेटणार नाही, असे खडसावले. चांगल्या घोषणा द्या, अंगार भंगार या काय घोषणा देतायत? हे संस्कार आहेत का आपले? असं म्हणत संतापलेल्या पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना झापले.

पंकजा मुंडे
पुण्यासह सात जिल्ह्यांनी महाराष्ट्राची चिंता वाढवली

सोमवारी गोपीनाथ गडावरुन निघालेल्या जनआशीर्वाद यात्रेला भाजपचा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी खासदार प्रीतम मुंडे, राणाजगजितसिंह पाटील, आमदार नमिता मुंदडा, आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण अण्णा पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, नितीन काळे, पदाधिकारी उपस्थित होते.

पंकजा मुंडे
आजपासून महाराष्ट्र अनलॉक, पाहा काय सुरु काय बंद?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com