Farmer Suicide: हाताशी आलेलं सोयाबीन भिजलं, बीडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer Suicide Beed

Farmer Suicide: हाताशी आलेलं सोयाबीन भिजलं, बीडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

बीडः परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यामध्ये पिकं नेस्तनाभूत झालेली आहे. हाताशी आलेलं सोयाबीन पीक पावसात भिजल्याने नैराश्येत गेलेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील राजेगाव येथे ही घटना घडली. संतोष अशोक दौंड (वय ४०) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. संतोष दौंड यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. यावर्षी पिकाचं उत्पन्न आल्यानंतर मुलीचं लग्न करण्याची ते तयारी करीत होते. परंतु सध्या सुरु असलेल्या परतीच्या पावसाने त्यांच्या शेतात काढलेलं सोयाबीन भिजलं शिवाय वाहूनही गेलं. पावसाने कापसाचंही नुकसान झालेलं आहे. हे पाहून संतोष हतबल झाले.

हेही वाचा: Himachal Pradesh Election: येथील लोक एका पक्षाला दुसऱ्यांदा सत्ता देत नाहीत, यावेळी मात्र...

आज सकाळी शेतात गेलेले संतोष माघारी परतले नाही. कुटुंबियांनी शोध घेतला असता लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृतदेह पाहून कुटुंबियांना एकच आक्रोश केला. मराठवाड्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातोय.

दरम्यान, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगून सरकार आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या पाठिशी असल्याचं सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी असा टोकाचा निर्णय घेऊन परिवार उद्ध्वस्त करुन घेऊ नये, असं आवाहन सत्तार यांनी केलंय. बीडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आठ दिवसांत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.

टॅग्स :BeedFarmerFarmer Suicide