चिक्कोडी जिल्ह्यासाठी बेमुदत उपोषणास प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

चिक्कोडी - चिक्कोडी जिल्हा घोषणेसाठी जिल्हा संघर्ष समितीच्यावतीने 26 जानेवारी व 5 फेब्रुवारी अशा दोन मुदती राज्य सरकारला दिल्या होत्या. पण यावर अद्याप कार्यवाही न झाल्याने आजपासून (ता. 5 ) बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले. 

चिक्कोडी - चिक्कोडी जिल्हा घोषणेसाठी जिल्हा संघर्ष समितीच्यावतीने 26 जानेवारी व 5 फेब्रुवारी अशा दोन मुदती राज्य सरकारला दिल्या होत्या. पण यावर अद्याप कार्यवाही न झाल्याने सोमवारपासून  (ता. 5 ) बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले. 

प्रारंभी विविध संघटनांच्या वतीने बसवेश्‍वर सर्कलमध्ये रास्तारोको करण्यात आला. यानंतर मिनी विधानसौध समोर उभारण्यात आलेल्या शामियान्यात उपोषणास प्रारंभ करण्यात आला.

20 वर्षापासून चिक्कोडी जिल्ह्याची मागणी करण्यात येत असून मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी चिक्कोडी जिल्हा निर्मिती शंभर टक्के करणार असल्याची घोषणा केली आहे. पण या भागातील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणामुळे हे प्रकरण रखडले आहे. या भागातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

- बी. आर. संगाप्पगोळ

आंदोलनात वकील संघ, करवे, शेतकरी संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी संघटना यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत. राज्यातील सर्वात मोठा बेळगाव जिल्हा असून 18 विधानसभा, 14 तालुके, 90 जिल्हा पंचायत सदस्यांची कार्यक्षेत्रे आहेत. चिक्कोडी जिल्हा निर्मिती झाल्यास या भागातील 25 लाख नागरिकांची सोय होणार आहे. शिवाय प्रशासनाच्या दृष्टीने सोईस्कर होणार आहे. 

प्रांताधिकारी गीता कौलगी, तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांनी आंदोलकांची समजुत घालण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम राहिले. आंदोलनात अल्लमप्रभू स्वामी, माजी आमदार दत्तू हक्‍क्‍यागोळ, आर. आर. पाटील, शेतकरी संघटनेचे नेते त्यागराज कदम, संजू बडिगेर, चंद्रकांत हुक्केरी, बसवराज ढाके, प्रशांत हुक्केरी, प्रताप पाटील, रमेश करनुरे, व्ही. एस. मांजरेकर, सुरेश ब्याकुडे, लक्ष्मण पुजारी, अप्पासाहेब चौगुला, अप्पासाहेब तडाखे उपस्थित होते. 

Web Title: Belgaum News agitation for Chikodi District