निपाणीत कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

निपाणी - भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ निपाणी व परिसरातील बहुजन समाजातर्फे शुक्रवारी (ता. 5) निपाणी बंदची हाक देण्यात आली होती. त्यास 100 टक्के प्रतिसाद मिळून कडकडीत बंद पाळण्यात आला.

निपाणी - भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ निपाणी व परिसरातील बहुजन समाजातर्फे शुक्रवारी (ता. 5) निपाणी बंदची हाक देण्यात आली होती. त्यास 100 टक्के प्रतिसाद मिळून कडकडीत बंद पाळण्यात आला.

शहरातील सर्वच व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. कर्नाटक व महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बससेवा सकाळी शहराबाहेरून सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना पायपीट करावी लागत आहे. बंदच्या पार्श्‍वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात एसआरपीच्या दोन तुकड्यांसह पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

Web Title: Belgaum News Bandh in Nipani