बेळगावात कॉलेज तरूणाची आत्महत्या

संजय सूर्यवंशी
मंगळवार, 30 जानेवारी 2018

बेळगाव - तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. साहील संतोष कोलवेकर (20, रा. नार्वेकर गल्ली, शहापूर) असे मृताचे नाव आहे. बारावीत सातत्याने नापास झाल्याने त्याने हे पाऊल उचलल्याची नोंद पोलिसांत आहे. 

याबाबत शहापूर पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, दररोज आठ वाजता उठणारा साहील आज साडेनऊ वाजले तरी उठला नाही. त्यामुळे वडिलांनी त्याच्या बेडरूमजवळ जाऊन त्याला हाक मारली. परंतु, आतून काहीच प्रतिसाद आला नाही. वडिलांनी खिडकीतून पाहिले असता तो लटकताना दिसला. दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले असता साहीलने बेडरूममधील लोखंडी हुकाला फडक्‍याने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. कुटुंबियांना व शेजाऱ्यांना बोलावून घेतले. ही माहिती शहापूर पोलिसांना कळविली. पोलीस उपनिरीक्षक ए. बी. नदाफ यांनी सहकाऱ्यासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

साहील हा जीएसएस कॉलेजमध्ये बारावीत शिकत होता. नापास झाल्यामुळे त्याने ही बाब मनाला लावून घेतली होती. यातूनच त्याने आत्महत्या केली असल्याची फिर्याद त्याचे वडील संतोष दत्ता कोलवेकर (50) यांनी पोलिसांत दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नोंद करून घेतली आहे. श्री नदाफ अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Belgaum News college boy suicide incidence