मालमत्तेच्या वादातून बेळगावात मुलाकडुन वडिलांचा खून

संजय सुर्यवंशी
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

बेळगाव -  लोखंडी रॉड डोक्यात घालून मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना गुरुवारी रात्री अंजनेय नगर येथे घडली. उमाकांत दंडावती मठ ( वय 70 रा. अंजनेयनगर ) असे मृताचे नाव आहे.

बेळगाव -  लोखंडी रॉड डोक्यात घालून मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना गुरुवारी रात्री अंजनेय नगर येथे घडली. उमाकांत दंडावती मठ ( वय 70 रा. अंजनेयनगर ) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा रवी याच्यावर माळमारूती पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मालमत्तेच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, उमाकांत हे बैलहोंगल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रोजंदारीवर काम करतात. गुरुवारी रात्री ते नेहमीप्रमाणे घरी आले. यावेळी घरी असलेल्या त्यांच्या मुलाने वाटणी संदर्भात भांडण काढले. हे भांडण वाढत जाऊन मुलाने  लोखंडी रॉडने वडिलांवर हल्ला केला. राॅड डोक्यात मारल्याने उमाकांत हे रक्तबंबाळ झाले. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात नेले. परंतु उपचाराचा उपयोग न होता त्यांचा मृत्यू झाला. माळमारुती पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Belgaum News Fathers murder in Property Dispute