सौंदलगा येथे कडबा घेऊन जाणाऱ्या ट्राॅलीला आग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

सौंदलगा - येथील मांगूर रस्त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर वीज वाहिन्यांच्या स्पर्शाने कडबा घेऊन निघालेल्या ट्रॅक्‍टर-ट्रॉलीला आग लागली. शुक्रवारी (ता. 23) दुपारी दीडच्या सुमारास येथे "बर्निंग ट्रॅक्‍टर'चा थरार अनुभवायला मिळाला

सौंदलगा - येथील मांगूर रस्त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर वीज वाहिन्यांच्या स्पर्शाने कडबा घेऊन निघालेल्या ट्रॉलीला आग लागली. शुक्रवारी (ता. 23) दुपारी दीडच्या सुमारास येथे "बर्निंग ट्रॅक्‍टर'चा थरार अनुभवायला मिळाला. त्यात बारवाड येथील शशिकांत महादेव अर्जुनवाडे यांचा 350 पेंढ्या कडबा जळून सुमारे पाच हजाराचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

आगीबाबत अधिक माहिती अशी, शशिकांत महादेव अर्जुनवाडे हे ट्रॅक्‍टरला (सीएनएन 4980) दोन ट्रॉली जोडून 700 पेंढ्या कडबा संकेश्‍वरहून बारवाडकडे घेऊन जात होते. सौंदलग्याजवळ आल्यानंतर वीजवाहिन्यांचा स्पर्श होऊन कडब्याने पेट घेतला. अर्जुनवाडे यांनी आरडाओरड केल्याने आरोग्य केंद्रातील कर्मचारी सिद्धू हक्‍यागोळ यांनी जळणाऱ्या ट्रॉलीपासून दुसरी ट्रॉली बाजूला केली. त्यामुळे एका ट्रॉलीतील 350 पेंढ्या कडबा खाक होऊन सुमारे पाच हजाराचे नुकसान झाले. निपाणी अग्निशामक बंबाला पाचारण करून आग आटोक्‍यात आणण्यात आली.

यावेळी शंकर हरिजन, आर. जी. चिवटे, विजय देवर्षी, लक्काप्पा बजंत्री, उदय पठाण, कमते यांनी आग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न केला. दिलीप आडसुळ यांनी हेस्कॉमच्या वीजवाहिन्या लोंबकळत असल्याचे कळविले होते. तरीही त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. 

Web Title: Belgaum News fodder burn with tractor in Soundalga