आयजीपी अलोक कुमार यांनी बेळगांव विभागाचा पदभार स्वीकारला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

बेळगाव - उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्हणून अलोक कुमार यांनी आज पदभार स्वीकारला. गेल्या महिन्यात डॉ. रामचंद्र राव यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. 

बेळगाव - उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्हणून अलोक कुमार यांनी आज पदभार स्वीकारला. गेल्या महिन्यात डॉ. रामचंद्र राव यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. 

जिल्हा पोलिस मुख्यालयातील पटांगणावर अलोक कुमार यांनी पोलिसांकडून मानवंदना स्वीकारली. त्यानंतर ओळख परेड झाली. अलोक कुमार यांनी आय जी पी कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला.  पोलीस आयुक्त डॉ. डी  सी राजप्पा, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. बी आर रवीकांते गौडा यांच्यासह अन्य जिल्ह्यातील पोलीसप्रमुखांनी त्यांचे स्वागत केले. उत्तर परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच येथील गुन्हेगारी व अपघात कमी करण्यासाठी आपण निश्चितच आराखडा आखू, असे आश्वासन आयजीपी अलोक कुमार यांनी दिले.

Web Title: Belgaum News IGP Alok kumar accept charge