बेळगावात 20 जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

बेळगाव -  20 जानेवारीपासून बेळगावात आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव होणार आहे. यासाठी 12 देशांमधील 22 जण, तर भारतातील सतरा पतंग उडवणारे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत, अशी माहिती माजी आमदार अभय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सावगाव रोडवरील अंगडी इन्स्टिट्यूटच्या परिसरात 20 ते 23 जानेवारी अखेर हा महोत्सव होणार आहे. पतंग महोत्सवाचे हे आठवे वर्ष असून दरवर्षी प्रमाणेच यंदाही मुलांसाठी मोठ्यासाठी विविध कार्यक्रम होणार आहेत 18 रोजी मिडि सेंटरचे उद्घाटन होणार आहे. 20 रोजी सकाळी साडेदहा वाजता पतंग महोत्सवाचे उद्घाटन होणार असून सायंकाळी पाच वाजता चिल्ड्रन्स फेस्टीव्हलचे  व सात वाजता डीजे शो होणार आहे. 21 रोजी खास तरुणाईसाठी उमंगचे आयोजन केले आहे.

मुलांसाठी खास पतंग महोत्सव व फुगे उडविण्याची स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. 23 रोजी क्रॅकर शो होणार असून विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना पतंग महोत्सवाचा आनंद घेता यावा तसेच बेळगावची बाजारपेठ वृद्धिंगत व्हावी, यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले जात असल्याचे अभय पाटील यांनी सांगितले.

Web Title: Belgaum News International Kite Fetival