खानापूरात सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन  

परशराम पालकर
बुधवार, 17 जानेवारी 2018

मराठी बांधवांनी एकाच झेंड्याखाली एकत्रित यावे. आपापसातले मतभेद बाजूला ठेवून मराठीसाठी अभेद एकी राखावी, असे आवाहन खानापूर तालुका म. ए.समितीच्यावतीने करण्यात आले. 

खानापूर  - भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर मराठी भाषिक भाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. महाजन अहवालाचे तुणतुणे वाजविण्यात आले. 14 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्न आहे. आता तो अंतिम टप्यात असून तालुक्यातील मराठी बांधवांनी एकाच झेंड्याखाली एकत्रित यावे. आपापसातले मतभेद बाजूला ठेवून मराठीसाठी अभेद एकी राखावी, असे आवाहन खानापूर तालुका म. ए.समितीच्यावतीने करण्यात आले. 

यावेळी अध्यक्ष माजी दिगंबर पाटील; आमदार अरविंद पाटील, विलास बेळगावकर, प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील, गोपाळ पाटील, नारायण कापोलकर, आबासाहेब दळवी उपस्थित होते.

Web Title: Belgaum News Khanapur Hutatma Day