बेळगाव महापाैर-उपमहापाैर निवडणूक एक मार्च रोजी

मल्लिकार्जुन मुगळी
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

बेळगाव - महापौर व उपमहापौर निवडणूक एक मार्च रोजी होणार आहे. प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णावर यांनी आज (गुरूवारी)  याबाबतचे निवडणूक वेळापत्रक जाहीर केले.

बेळगाव - महापौर व उपमहापौर निवडणूक एक मार्च रोजी होणार आहे. प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णावर यांनी आज (गुरूवारी)  याबाबतचे निवडणूक वेळापत्रक जाहीर केले.

एक मार्च रोजी प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एक वाजता महापालिकेची विशेष बैठक होईल. या बैठकीत नूतन महापौर व उपमहापौरांची निवड होईल. बेळगावाचे महापौरपद अनुसूचीत जमातीसाठी तर उपमहापौरपद इतर मागास  'अ' प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव आहे. अनुसूचीत जमातीचे दोन्ही नगरसेवक विरोधी गटाकडे आहेत, त्यामुळे यावेळी महापौरपद बिगरमराठी नगरसेवकांना मिळणार हे नक्की आहे. बसाप्पा चिक्कलदिन्नी व सुचेता गंडगुद्री यांच्यात महापौरपदाचा सामना होणार आहे. उपमहापौरपदासाठी सत्ताधारी गटातील मिनाक्षी चिगरे व मधुश्री पुजारी यांच्यात चुरस आहे.

Web Title: Belgaum News Mayour election on one March