अपघातात संकेश्‍वरचा दुचाकीस्वार ठार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

संकेश्‍वर - महामार्गावर हत्तरगीनजीक गुरूवारी (ता. 1) रात्री झालेल्या अपघातात संकेश्‍वरचा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. इम्रान अस्लम खानापुरे (वय 22, रा. ढंग गल्ली) असे मृताचे नाव आहे. या अपघातामध्ये संतोष राजन्नावर (वय 26, रा. अंकली रोड) हा जखमी झाला आहे. 

इम्रान खानापुरे व संतोष राजन्नावर हे संकेश्‍वर येथून दुचाकीने दड्डी (ता. हुक्केरी) येथे यात्रेसाठी निघाले होते. त्यांची दुचाकी रस्त्याकडेला घसरून हा अपघात झाला. त्यात इम्रान खानापुरे याच्या डोक्‍याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला संतोष राजन्नावर जखमी झाला. त्याला उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची नोंद यमकनमर्डी पोलिसात झाली आहे. इम्रानच्या मागे आई, तीन भाऊ असा परिवार आहे. तो येथील एका खासगी दुकानात कामास होता. 

Web Title: Belgaum News one dead in an accident near Hattargi