तरुणास चिरडल्याने जमावाने पेटविला अपघातग्रस्त ट्रक

संजय सुर्यवंशी
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

बेळगाव - येथील आरटीओ सर्कलजवळ दुपारी साडेतीनच्या सुमारास दुचाकीला ट्रकची धडक  बसली. या अपघातामध्ये तरुण जागीच ठार झाला. यानंतर संतप्त जमावाने अपघातमधील संबंधीत ट्रक पेटविला. इनायत बशीर अहंमद शेख (वय 20, टोपी गल्ली) असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे 

किल्ला तलावाकडून दुपारी साडेतीनच्या सुमारास ट्रक येत होता . टोपी गल्लीत राहणारा तरुण इनायत बशीर अहंमद शेख हा काकती वेसकडे गॅरेजमध्ये कामाला निघाला होता. यावेळी ट्रकची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक बसली. त्यानंतर चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. यावेळी संतप्त जमावाने ट्रकला आग लावली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. घटनेमुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

Web Title: Belgaum News people burn truck after accident