संगोळी रायण्णा समाधीस्थळ विकासाच्या प्रतीक्षेतच 

परशराम पांडव
गुरुवार, 25 जानेवारी 2018

खानापूर - खानापूर तालुक्‍याच्या दृष्टीकोनातून 26 जानेवारीला अनन्यसाधारण महत्व आहे. याचदिवशी क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णांना ब्रिटिशांनी नंदगडजवळ (ता. खानापूर) फासावर लटकावले. उद्या (शुक्रवारी) या घटनेला 187 वर्षे पूर्ण होत आहेत. बेळगावात झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, मंत्रिमहोदयांनी समाधी स्मारकाला भेट देऊन विकास करण्याची आश्‍वासने दिली. परंतु, आजपर्यंत विकासाचा प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. 

15 ऑगस्ट 1798 ते 26 जानेवारी 1831 चा काळ संगोळ्ळी रायण्णांनी गाजविला होता. राणी चन्नम्मांच्या शासनकाळात सेनापती पद त्यांनी सांभाळले होते. भारतावर इंग्रजांचे वाढते आक्रमण पाहून 1824 च्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले. अंत्यत धूर्त, घोडेस्वारीत तरबेज आणि पट्टीचा पोहणारा असल्यामुळे युध्दात इंग्रजांना त्यांनी जेरीस आणले होते. इंग्रजांपासून असलेला धोका ओळखून त्यांनी आपल्यासह सैनिकांच्या रक्षणासाठी नंदगड भागात किल्ला बांधला. त्याला आनंदगड नावाने ओळखतात. याठिकाणी दरवर्षी दसऱ्याला यात्रा भरते.

संगोळी रायण्णा तलावात आंघोळ करत असतानाच इंग्रजांनी त्यांच्यावर पाळत ठेऊन पकडले. त्यानंतर त्यांना फासावर लटकवले. गणेशवाडी (ता. बैलहोंगल) त्यांचे जन्मगाव असले तरी हंडीभंडगनाथ, हालसिध्दनाथ मठातही त्याचे बालपण गेले आहे. कुरुक्षेत्र हरियाणाच्या धर्तीवर संगोळी रायण्णा समाधी स्मारकाचा विकास करण्याचा प्रस्ताव असला, तरी तो शासनाच्या लालफितीच अडकून पडला आहे. 

संगोळी रायण्णांवर एक नजर 

  • 26 जानेवारी 1831 ला नंदगडजवळ फाशी 
  • 7 बाय 4 आकाराचा चौथरा व 7 फूट उंचीचा माहिती अशोकस्तंभ उभारण्याचा प्रस्ताव
  • 2012 मध्ये स्तंभासाठी निधीची तरतूद 
  • माजी मुख्यमत्री सदानंद गौडांकडून 10 कोटीचा आराखडा तयार 
  • संगोळी रायण्णाच्या नावे सैनिक स्कूलची स्थापना. 
  • संगोळी रायण्णाच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती 

संगोळी रायण्णा समाधीस्थळ सुशोभित करण्यासाठी संगोळी रायण्णा प्राधिकरणाखाली भूसेनेला कंत्राट देण्यात आले आहे. याच्या विकासासाठी नंदगड ग्रामपंचायतीने पर्यटन विकास खाते तसेच संबंधित खात्यांना पत्रव्यवहार करुन नंदगडला पर्यटनस्थळाचा दर्जा तसेच अतिरिक्त अनुदान देण्याची मागणी केली आहे. सध्या टप्प्याटप्प्याने काम सुरु असले तरी तांत्रिक कारणांमुळे पूर्ण विकास झालेला नाही.
- प्रभू पारिश्वाडकर,
अध्यक्ष, नंदगड ग्रामपंचायत 
 
Web Title: Belgaum News Sangoli Rayanna Samadhi place development issue