सुधीरकुमार रेड्डींनी स्विकारला बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखपदाचा कार्यभार 

संजय सूर्यवंशी
मंगळवार, 23 जानेवारी 2018

बेळगाव - नूतन जिल्हा पोलीस प्रमुख सी. एच. सुधीरकुमार रेड्डी यांनी आज पदभार स्विकारला. मावळते पोलीस प्रमुख डॉ. बी. आर. रविकांते गौडा यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.

बेळगाव - नूतन जिल्हा पोलीस प्रमुख सी. एच. सुधीरकुमार रेड्डी यांनी आज पदभार स्विकारला. मावळते पोलीस प्रमुख डॉ. बी. आर. रविकांते गौडा यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.

डॉ. रविकांते गौडा यांची मंगळूरला बदली झाली असून, तेथे कार्यरत असलेले पोलीस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी आता जिल्ह्याचा कारभार पाहणार आहेत. 

इतक्‍या मोठ्या जिल्ह्यात काम करणे हे माझ्यासाठी आव्हान राहणार आहे. आपल्याला शिकण्यासाठी बरेच काही मिळेल.  या भागात मी नवीनच आहे. परंतु, जिल्हा समजावून घेऊन आपण काम करू,

- सी. एच. सुधीरकुमार रेड्डी, जिल्हा पोलीस प्रमुख

सुधीरकुमार रेड्डी 2010 बॅचचे आयपीएस अधिकारी असून, ते मूळचे आंध्र प्रदेशातील आहेत. यापूर्वी त्यांनी मंड्या, बिदर येथे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून काम केले केले आहे. पूर्वी त्यांनी भटकळ येथे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. मंगळूर येथे निर्माण झालेला जातीय तणाव त्यांनी व्यवस्थित हाताळला आहे.

Web Title: Belgaum News Sudhirkumar Reddy as SP