बहिणीच्या लग्नाच्या कर्जाची चिंता, भावाची आत्महत्या 

बहिणीच्या लग्नाच्या कर्जाची चिंता, भावाची आत्महत्या 

बेळगाव - दिड वर्षांपूर्वी बहिणीचे लग्न केले. वडील वृद्ध असल्यामुळे सर्व जबाबदारी मनोजवर पडली. फौंड्रीत कामावर जाऊन कर्ज कसे फेडायचे? ही चिंता त्याला भेडसावत होती. यातूनच त्याने रविवारी (ता. 11) रात्री रेल्वेखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केली. मनोज नंदाजी पाटील (24, रा. पाटील गल्ली, खादरवाडी) असे मृताचे नाव आहे. 

हा उद्यमबागमधील फौंड्रीत सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. रविवारी सुटी काढून तो दुपारी क्रिकेट खेळण्यासाठी म्हणून बाहेर पडला. रात्रीचे दहा वाजून गेले तरी परतला नसल्यामुळे घरच्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली. परंतु, तो कुठेच सापडला नाही. 

स्मार्टकार्डमुळे ओळख 
चौथ्या रेल्वे फाटकाजवळ रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. रेल्वे पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी मृताच्या खिशात त्याच्या दुचाकीची नोंदणी असलेले स्मार्टकार्ड मिळाले. रात्रभर आपल्या मुलाला शोधणाऱ्या पालकांना चौथ्या रेल्वे फाटकाजवळ कोणी तरी पडले असल्याची माहिती मिळाली. त्यांनी जाऊन पाहणी केली तेव्हा तो मृतदेह मनोजचा असल्याचे स्पष्ट झाले.

घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक बी. टी. वालीकर अधिक तपास करीत आहेत. 

बहिणीच्या कर्जाची चिंता 
मनोजच्या वडिलांनी रेल्वे पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले की, मनोजच्या बहिणीचे दिड वर्षांपूर्वी थाटामाटत लग्न केले आहे. परंतु, त्याचे कर्ज झाले होते. फौंड्रीत काम करून हे कर्ज कसे फेडायचे? याची चिंता त्याला सतत भेडसावत होती. यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. रेल्वे पोलिसांनी तशी नोंद करून घेतली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com