सीमाप्रश्नी चर्चेसाठी बेळगाव महापाैरांनी मुंबईला यावे - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

बेळगाव - महापौर संज्योत बांदेकर व मराठी नगरसेवकांना मुंबईला येण्याचे निमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. 24) दिले. महापौर बांदेकर, सत्ताधारी गटनेते पंढरी परब, माजी महापौर किरण सायनाक, सरीता पाटील व अन्य मराठी नगरसेवकांनी शिनोळी येथे ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत ठाकरे यांच्याशी सीमाप्रश्‍नाबाबत चर्चा करण्यात आली. 

सीमाप्रश्‍न सोडविण्याबाबत शिवसेना कटीबद्ध आहे, पण त्यासाठी सीमावासीयांकडून सातत्याने पाठपुरावा व्हायला हवा असे उद्धव ठाकरे म्हणाले. सीमाभागात काहीही घडले किंवा शिवसेनेचे नेते सीमाभागात आले तर सीमावासीयांकडून भेट घेतली जाते. त्याऐवजी सीमाप्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला जावा, असे ठाकरे म्हणाले.

सीमाप्रश्‍नबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी महापौर व मराठी नगरसेवकाना मुंबईला येण्याचे निमंत्रण त्यांनी दिले. महापौरांनी ते निमंत्रण स्विकारले व डिसेंबरमध्ये मुंबईला येणार असल्याचे सांगीतले. महापौर बांदेकर यांचे माहेर असलेल्या महाडचे आमदार भरतशेठ गोगवले यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात महापौरानी गोगवले यांच्याशी चर्चा केली होती. ठाकरे यांचे शुक्रवारी सकाळी सांबरा विमानतळावर आगमन झाल्यानंतर शिवसैनिक व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यानी त्यांची भेट घेतली. पण महापौर व मराठी नगरसेवकानी शिनोळी येथे ठाकरे यांची भेट घेतली. 

नगरसेवक रतन मासेकर, विजय भोसले, राजू बिर्जे, मोहन भांदुर्गे, राकेश पलंगे, मनोहर हलगेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Belgaum News Uddhav Thakare comment