गौंडवाडला सिलिंडर स्फोटात महिला  ठार

गौंडवाडला सिलिंडर स्फोटात महिला  ठार

बेळगाव - रात्रीच्या वेळी गळती झालेल्या सिलिंडरचा अंदाज न आल्याने पहाटे शेगडी पेटविण्यासाठी गेलेली महिला सिलिंडर स्फोट होऊन जागीच ठार झाली. सुधा दुर्गाप्पा पंगण्णवर ( वय 25, रा गौंडवाड तालुका बेळगाव ) असे मृत महिलेचे नाव आहे. आज पहाटे पाचच्या सुमारास राहत्या घरात ही घटना घडली.

गौंडवाड येथे पती-पत्नी दोघेच राहतात. आज पहाटे दोघेही नेहमीप्रमाणे उठले. पती दुर्गाप्पा  घरापासून काही अंतरावर असलेल्या कूपनलिकेवरून पाणी आणण्यासाठी गेले. सुधा चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्या. सिलिंडरला गळती लागून संपूर्ण घरात गॅस पसरला होता. परंतु झोपेत असलेल्या सुधा यांना याचा अंदाज आला नाही. त्यांनी काडी ओढताच अचानक आगीचा भडका उडाला. संपूर्ण घरात आग पसरल्याने सिलिंडरनेही पेट घेतला व त्याचा स्फोट होऊन सुधा जागीच ठार झाल्या.

पाणी घेऊन घराकडे आलेल्या पतीला पत्नीचा जळतानाचा मृतदेह पाहून अश्रू अनावर झाले. त्यांनी हंबरडा फोडत शेजाऱ्यांना बोलावले, तत्पूर्वी सुधा या जागीच गतप्राण झाल्या होत्या. घटनेची माहिती पोलिसांना कळविताच काकतीचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन हंचिनमणी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.  मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पाठविण्यात आला. काकती पोलिसात घटनेची नोंद झाली असून श्री हंचिनमणी अधिक तपास करीत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com