टेम्पोच्या धडकेत मुतगा येथील तरुण ठार

संजय सूर्यवंशी
गुरुवार, 25 जानेवारी 2018

मुतगा - टेम्पोची दुचाकीला धडक बसून दुचाकीस्वार ठार झाला. बुधवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास सांबरा रोडवरील बसवण कुडचीपासून एक किलोमीटरवरील पोद्दार स्कूलजवळ हा अपघात घडला. राजेश कृष्णा पाटील ( वय 21 रा. मुतगा ) असे मृताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की राजेश उद्यमबागमध्ये कामाला होता. कामावरून तो होनगा येथील यात्रेसाठी गेला होता. तेथे जेवण करून तो रात्री बाराच्या सुमारास घरी परतला. पोद्दार स्कूलच्या पुढील बाजूस पुजारी कॉम्पलेक्स जवळ करडीगुद्दीहून येणाऱ्या 407 टेम्पोने राजेशच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये राजेश रस्त्यावर कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. वाहतूक उत्तर विभाग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक एम. बी. गुजनाळ अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Belgaum News youngster dead in an accident near Mutaga