'बेसील' करणार केबलचे ऑडिट

'बेसील' करणार केबलचे ऑडिट

औरंगाबाद : ट्रायच्या नियमानुसार केबल दरांची अंमलबजावणी देशात सुरू झाली; याबाबत ग्राहकांना काय, सर्व्हिस प्रोव्हायडरलादेखील संपूर्ण माहिती नाही, असे असताना ट्रायने आपले नियम कठोर करीत ग्राहकांना अधिक चांगली आणि हवी ती सुविधा देण्यासाठी दंड थोपटले आहेत. त्यानुसार आता स्थानिक केबल नेटवर्कपासून ते डीटीएच नेटवर्क यांचे ऑडिट होणार आहे. यासाठी ट्रायने "बेसील'ची (ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टस्‌ इंडिया लिमिटेड) नियुक्ती केली आहे.

ट्रायने ग्राहकांना स्वतःच्या आवडीच्या वाहिन्या निवडीची मुभा मिळावी, यादृष्टीने नियमावली जारी केली. कोणत्याही ग्राहकाने आपल्या आवडीनुसार चॅनेल घेऊन तेवढेच पैसे भरावेत, त्यामुळे नको असणाऱ्या चॅनेलपासून ग्राहकांची सुटका झाली; परंतु अनेक केबल व्यावसायिकांनी ग्राहकांना पॅकेज सिस्टीमचा आग्रह केला आहे, त्यासाठी अधिकचे दर लावले आहेत.

मुळात बेसपॅक आणि आणि त्यावर निवडलेले आवडीचे चॅनेल एवढीच रक्कम भरण्याचा निर्णय आहे; मात्र काही व्यावसायिक प्रत्येक पॅकेज आणि नेटवर्क कॅपॅसिटी शुल्काच्या नावाखाली पैसे आकारत आहेत. यामुळे अधिकचा खर्च ग्राहकांना सहन करावा लागत आहे. व्यावसायिकांच्या या धोरणावर निर्बंध घालण्यासाठी "बेसील'ची नियुक्ती केली आहे. बेसीलद्वारे नेटवर्क प्रोव्हाईडरचे ऑडिट केले जाणार आहे. 

"बेसील'चे काम

"बेसील'द्वारे देशातील सर्व केबल ऑपरेटरचे ऑडिट केले जाणार आहे. कोणत्याही परिसरातील कोणत्याही केबल ऑपरेटरची माहिती घेऊ शकतील. सर्व्हिसबाबत चौकशी करून केबल ऑपरेटरवर कारवाईची तरतूद आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com