कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राज्यात सर्वोत्कृष्ट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

मुंबई - कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने गेल्या वर्षभरात राज्यात सर्वोत्कृष्ट काम केले. या कामाची दखल घेऊन उच्च न्यायालयाने जिल्हा विधी सेवा 

प्राधिकरणास सर्वोत्कृष्ट विधी सेवा प्राधिकरणाचा पुरस्कार जाहीर केला. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या समारंभात जिल्हा विधी प्राधिकरणचे चेअरमन न्या. आर. जी. अवचट आणि सचिव न्या. उमेशचंद्र मोरे यांना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 

जे लोक न्याय यंत्रणेपर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना वेळेत, तसेच सुलभतेने न्याय मिळावा यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने महत्त्वाचे योगदान दिले आहे. दिवाणी खटले, मिटवता येण्यासारखे फौजदारी खटले, मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, जमीन अधिग्रहण खटले, विमा कंपनी, बॅंक वसुलीसंबंधी खटले, कौटुंबिक वादासंबंधी खटले, अशा सर्व दाखल व दाखलपूर्व खटल्यांचा जास्तीत जास्त निपटारा करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने काम केले आहे. यासाठी वेळोवेळी जनजागृती करून न्यायापासून वंचित राहणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न विधी सेवा प्राधिकरणने केला आहे. या कामाची दखल घेऊन उच्च न्यायालयाने कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्याचा पुरस्कार देण्यात आला. 

याशिवाय जिल्हा राष्ट्रीय लोक अदालत पुरस्कार सातारा येथील बी. यू. देवाडवार, समन्वय पुरस्कार बीड येथील ए. एल. पानसरे, समन्वयक न्यायाधीश पुरस्कार पुण्याचे आर. व्ही. कोकरे, रेफरल न्यायाधीश बांद्रे येथील पी. ए. साने, तर समन्वय वकीलचा पुरस्कार शर्मिला चारलवार आणि विधी शाखेचा विद्यार्थी अनुज वानखेडे यांना देण्यात आला. याशिवाय न्यायव्यवस्थेतील पैलूंचा वेध घेणाऱ्या चर्चासत्रात मान्यवरांनी मते प्रदर्शित केली.

Web Title: Best Kolhapur District Legal Services Authority in the state