Bhagat Singh Koshyari: 'उद्धव हे संत व्यक्ती, ते राजकारणात कुठे अडकले'; कोश्यारींकडून सध्याच्या परिस्थितीवर भाष्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagat Singh Koshyari

Bhagat Singh Koshyari: 'उद्धव हे संत व्यक्ती, ते राजकारणात कुठे अडकले'; कोश्यारींकडून सध्याच्या परिस्थितीवर भाष्य

भगतसिंह कोश्यारी राज्यपाल पदावरुन पाय उतार झाले आहेत. त्यांनी स्वतःहून या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत राज्यातील राजकारणार भाष्य केलं. यावेळी त्यांने अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. (Bhagat Singh Koshyari Uddhav Thackeray maharashtra politics)

भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतंच मुंबई तकला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर भाष्य केलं. त्यांचे कौतुक करत मोठी खंत व्यक्त केली.

काय म्हणाले कोश्यारी?

उद्धव ठाकरे संत व्यक्ती आहे. ते राजकारणात फसले आहेत. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की ते कशाप्रकारे अडकले आहेत. पाच पानांचे पत्र लिहीत आहे. म्हणून बोलत आहे.

राजकारण्यांशी असलेल्या संबंधांबाबत ते म्हणाले, 'माझे संबंध खूप चांगले होते. पण उद्धव ठाकरेंचे सल्लागार कोण होते? असा सवाल उपस्थित करत त्यांचे सर्व आमदार येऊन म्हणायचे की तुम्ही आम्हाला वाचवा, उद्धव हे शकुनी मामाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यांचा शकुनी मामा कोण होता माहीत नाही. असं राज्यपाल मुलाखतीवेळी म्हणाले.