भंडारासह चार जिल्ह्यांत कर्करोग तपासणी केंद्र 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

नागपूर - कर्करोगाचे दिवसेंदिवस वाढते प्रमाण लक्षात घेता, या आजाराची वेळीच तपासणी करून त्यावर उपचार होण्यासाठी भंडारा, सातारा, वर्धा व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कर्करोग तपासणी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. सदस्य सुनील केदार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सावंत बोलत होते. 

ते म्हणाले, की नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करोग केंद्राला दहा कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, तो आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. राज्यात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. या आजाराची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा रुग्णालयात भंडारा, वर्धा, सातारा व सिंधुदुर्ग येथे कर्करोग तपासणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंबईसह महापालिका क्षेत्रामध्येही असे तपासणी केंद्र सुरू करण्याबाबत संबंधित विभागाला कळविण्यात येईल. 

""ग्रामीण, आदिवासी भागात या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी सेवाभावी संस्था व एनजीओ यांच्यामार्फत अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत महिलांची तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या वतीने औरंगाबाद येथे राज्य कर्करोग केंद्र (डींरींश उरपलशी णपळीं) लवकरच सुरू होणार आहे. तसेच नागपूर येथे सामाजिक न्याय विभागामार्फत 120 कोटी रुपये खर्च करून असे केंद्र सुरू केले जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी या वेळी विचारलेल्या उपप्रश्नाला दिली. 

त्याचबरोबर कर्करोग व डायलिसिस या आजारासंबंधीची औषधे करमुक्त करण्यात आली आहेत. येत्या अर्थसंकल्पापासून देशात जीएसटी होणार असल्याने या पुढील काळातही या आजारांवरील औषधे करमुक्त ठेवण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करू, अशी माहिती वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वेळी उपस्थित केलेल्या उपप्रश्नाच्या उत्तरात दिली. 

Web Title: Bhandara districts with four cancer examination center