Bharat Jodo : रात्री राहुल गांधींचा संजय राऊतांना फोन; म्हणाले,"आम्हाला तुमची चिंता..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi Sanjay Raut
Bharat Jodo : रात्री राहुल गांधींचा संजय राऊतांना फोन; राऊत म्हणतात,"ओलावा संपला आहे...."

Bharat Jodo : रात्री राहुल गांधींचा संजय राऊतांना फोन; म्हणाले,"आम्हाला तुमची चिंता..."

काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेदरम्यान, राज्यातले अनेक प्रमुख नेते या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. या यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांनी रात्री आपल्याला फोन करून तब्येतीची विचारपूस केली असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याविषयीचं ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, "भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल गांधी यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती, असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दु:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे.यात्रेत तो दिसतोय."

हेही वाचा - Shraddha Walker Case: वेबसीरीज ठरतेय का गुन्ह्यांचं गाइडबुक?

यानंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "राहुल गांधींसोबत माझं काल बोलणं झालं. त्यांनी माझी चौकशी केली. मी जेलमध्ये असताना किती जण आले? माझ्या कुटुंबियांसोबत उभे राहिले? राज्यातल्या प्रत्येक पक्षात माझे जुने सहकारी आहेत, पण किती आले? राजकीय मतभेद असले तरी अशावेळी गांधी कुटुंबियांनी माझी चौकशी केली. आज राहुल गांधी देशभरात फिरतायत, त्यांच्यात साहेबपणा नाहीये."