'भारिप, एमआयएम युतीचा भाजपला फायदा'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

पुणे - दलित आणि मुस्लिम मतदारांना सोबत घेण्यासाठी माजी खासदार प्रकाश आंबेडकर, भारिप बहुजन महासंघासोबत ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहदुल मुसलमीन’ (एमआयएम) यांच्याशी युती करून आगामी निवडणुका लढविणार आहेत. परंतु, सर्वच दलित आंबेडकरांसोबत नाहीत. तसेच, सर्वच मुस्लिम एमआयएमच्या ओवेसी यांच्यासोबत नाहीत. त्यामुळे या युतीचा भाजपलाच फायदा होईल, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला.

एका शासकीय कार्यक्रमानिमित्त ते रविवारी पुण्यात आले होते. तत्पूर्वी, शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आठवले म्हणाले, ‘‘आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत रिपाइंची आघाडी राहणार आहे. आम्ही सातारा आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन जागा मागणार आहोत. त्यापैकी दक्षिण मध्य मुंबईतून मी स्वतः निवडणूक लढविणार आहे. सातारा लोकसभेमध्ये उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे उदयनराजे यांनी रिपाइंतर्फे निवडणूक लढवावी. दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि बॅरिस्टर ओवेसी यांनी राज्यात युती केली आहे. त्यांचा फारसा परिणाम होणार नाही. त्यांच्यासोबत काँग्रेस पक्ष जाणार नाही. कदाचित राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युतीदेखील होणार नाही. शरद पवार हे धर्मनिरपेक्ष नसल्याचा आरोप आंबेडकर करीत आहेत. तो खोटा आहे, पवार साहेब हे पुरोगामी आणि फुले, शाहू, आंबेडकरांना मानणारे आहेत. त्यांच्यामुळेच मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळाले.’’

आठवले नेमके काय म्हणाले...
 शिवसेनेच्या कोट्यातील दक्षिण-मध्य मुंबईची जागा रिपाइंला सोडण्याची आमची मागणी
 कोरेगाव भीमा दंगलीमध्ये एल्गार परिषदेचा काही संबंध नाही
 वढू बुद्रुक समाधी तोडफोडीमुळे दलितांवर हल्ले
 काही आंबेडकरवादी नक्षलवाद्यांशी संबंधित आहेत का, हे न्यायालयात सिद्ध होईल

Web Title: Bharipa Bahujan Mahasangh and MIM Alliance BJP has the advantage says Ramdas Athawale